लोणार तालुक्यातील २0 गावांत गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:14 AM2018-02-12T01:14:08+5:302018-02-12T01:14:14+5:30

लोणार : तालुक्यातील २0 गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला असून, गहू, हरभरा, नेटशेड असे एकत्रित लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

Hail hit in 20 villages of Lonar taluka | लोणार तालुक्यातील २0 गावांत गारपिटीचा फटका

लोणार तालुक्यातील २0 गावांत गारपिटीचा फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील २0 गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला असून, गहू, हरभरा, नेटशेड असे एकत्रित लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  
लोणार तालुक्यातील टिटवी, देऊळगाव वायसा, जांबूळ, गोत्रा, अजीसपूर, खुरमपूर, जाफ्राबाद, बागुलखेड, दाभा, गुंजखेड, शिवनी जाट, पिंपळनेर, वढव, नांद्रा परिसरात वादळ वार्‍यासह गारपीट झाल्याने गहू, हरबरा, नेडशेड मधील पिकांचे नुकसान झाले. शेतामध्ये गारांचा सडा पडलेला होता. शेतामध्ये बांधलेल्या जनावरांना गारांचा मार बसल्यामुळे काही जनावरे जखमी झाली. 
नुकसानग्रस्त भागात आ.डॉ. संजय रायमुलकर, शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना तालुका प्रमुख बळीराम मापारी, जि.प. सदस्य राजेश मापारी, जि.प. सदस्य गोदावरी कोकाटे, पं.स. सभापती निर्मला जाधव, सरपंच भगवान कोकाटे यांनी पाहणी केली. तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांना नुकसानाची माहिती दिली. 
दरम्यान, नायब तहसीलदार आर.डी. डाके यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पथकाने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामा केला.   

Web Title: Hail hit in 20 villages of Lonar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lonarलोणार