शेगावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान
By सदानंद सिरसाट | Updated: April 23, 2024 15:21 IST2024-04-23T15:21:09+5:302024-04-23T15:21:35+5:30
दुपारी आलेल्या वादळात शहरातील विविध परिसरात अनेक झाडे पडली आहेत.

शेगावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किरकोळ व्यापाऱ्यांचे नुकसान
खामगाव : शेगाव शहरात मंगळवारी दुपारी तीन वाजता अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसात गारा पडल्याने एकच तारांबळ उडाली. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. तर या वादळाने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
दुपारी आलेल्या वादळात शहरातील विविध परिसरात अनेक झाडे पडली आहेत. आठवडी बाजार असल्याने शेतीमाल व किरकोळ साहित्य विक्रीसाठी असलेल्या दुकानांचे अतोनात नुकसान झाले. वाऱ्याचा प्रचंड वेग आणि त्यातच पावसासह गारा यामुळे नागरिकांची भंबेरी उडाली.