डोणगाव येथे गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:49+5:302021-03-21T04:33:49+5:30

गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक ऐन कोरोना काळात हातातून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. रात्री आलेल्या वादळामुळे मेहकर ते ...

Hailstorm at Dongaon | डोणगाव येथे गारपिटीचा तडाखा

डोणगाव येथे गारपिटीचा तडाखा

Next

गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक ऐन कोरोना काळात हातातून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. रात्री आलेल्या वादळामुळे मेहकर ते डोणगाव रोडवर, डोणगाव ते आरेगाव रोडवर, शेलगाव देशमुख ते डोणगांव रोडवर अनेक झाडे हवेने उन्मळून पडले. अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेले. राज्य महामार्गावरील झाडे पडल्याने जवळपास तीन तास वाहतूक बंद होती. एका कंटेनर वर झाड पडले होते. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. हवेमुळे डोणगाव परिसरातील विद्युत पोल व तारा तुटल्याने डोणगांव वासीयांना रात्र अंधारात घालवावी लागली. महामार्गावर पडलेली झाडे पोलिस व पोलिस मित्रांनी काढण्यास मदत केली. २० मार्चला जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर व मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, संदीप मेटांगळे, सुधाकर कंंकाळ, विष्णू शिरसाठ, विठ्ठल धांडे, तलाठी शिवप्रसाद म्हस्के, सुरेखा वाठोरे, पल्लवी गुंठेवार, अनुप नरोटे, कृषी सहायक बोंद्रे, बोरूडे, उत्तम परमाळे यांनी शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी कांदा, पपई, भाजीपाला, केळी, संत्रा, लसण, शेतातील नेटशेड आदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: Hailstorm at Dongaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.