खामगाव शहरात दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:45 PM2018-08-25T12:45:38+5:302018-08-25T12:48:14+5:30

खामगाव: शहरात तब्बल दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. अवैध नळ कनेक्शन कापण्यासाठी राजकीय दबाव वाढत असून; यामुळे पालिका प्रशासन चांगलेच मेटाकुटीस आल्याचे दिसून येते. 

Half and tohounds of illegal taps connection in Khamgaon city! | खामगाव शहरात दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन!

खामगाव शहरात दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन!

googlenewsNext
ठळक मुद्देनगर पालिका प्रशासनाकडून शहरातील १० हजार ४०० नागरिकांना अधिकृत नळ जोडणी देण्यात आली आहे. गेल्या काही  वर्षांपासून खामगाव शहरात अवैध नळ कनेक्शनची समस्या वाढीस लागली आहे. मुख्य पाईपलाईन  फोडून काही ठिकाणी अवैध नळ कनेक्शन टाकण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

- अनिल गवई

खामगाव: शहरात तब्बल दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. अवैध नळ कनेक्शन कापण्यासाठी राजकीय दबाव वाढत असून; यामुळे पालिका प्रशासन चांगलेच मेटाकुटीस आल्याचे दिसून येते. 

सुमारे एक लाख लोकसंख्येच्या खामगाव शहरात २३ हजार कुटुंबसंख्येची नोंद पालिकेच्या दप्तरी आहे. नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी  नगर पालिका प्रशासनाकडून शहरातील १० हजार ४०० नागरिकांना अधिकृत नळ जोडणी देण्यात आली आहे. या नळ कनेक्शन धारकांना पालिका प्रशासनाकडून सहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी पालिकेने खामगाव शहराची झोन निहाय विभागणी केली असून, फिरत्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा केल्या जातो. मात्र, गेल्या काही  वर्षांपासून खामगाव शहरात अवैध नळ कनेक्शनची समस्या वाढीस लागली आहे. दिवसेंदिवस अवैध नळ कनेक्शनमध्ये भर पडत असल्याने, खामगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे दिसून येते.

अवैध नळ कनेक्शनमुळे अधिकृत नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा प्रभावित होत असल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. याबाबत पालिकेत लेखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेने अवैध नळ कनेक्शन शोध मोहिम राबविली. यामध्ये शहराच्या विविध भागात तब्बल दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन आढळून आल्याचा दावा विश्वसनीय सुत्रांनी केला आहे. अंतर्गत पाईपलाईनसोबतच मुख्य पाईपलाईन  फोडून काही ठिकाणी अवैध नळ कनेक्शन टाकण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.

पाच हजारावर वैयक्तिक पाणी पुरवठा व्यवस्था!

खामगाव शहरातील नागरिकांकडे   १० हजार ४०० नळ कनेक्शन असून, पाच हजारावर  वयक्तिक विहिरी आणि बोअर आहेत. त्याचप्रमाणे  ४१० सार्वजनिक नळ कनेक्शन आणि ५ मोठ्या सार्वजनिक विहिरींआहेत. याद्वारे नागरिक आपला पिण्याचा प्रश्न सोडवितात. 


पोलिस बंदोबस्ताची प्रतीक्षा!

खामगाव शहरातील अवैध नळ जोडणी कापण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. यासाठी मुख्याधिकारी यांनी शहर पोलिस स्टेशनला पत्र देखील दिले आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने, शहरातील अवैध नळ कनेक्शन कापणी मोहिम रखडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

  तक्रारींकडे पालिकेची चालढकल!

खामगाव शहरातील अवैध नळ कनेक्शनमुळे अधिकृत नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा प्रभावित होत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेच्या दप्तरी प्राप्त आहेत. मात्र, तक्रारींची साधी दखलही घेतल्या जात नसल्याची ओरड तक्रारदारांकडून केली जात आहे. बाळापूर फैलातील एका तक्रारदाराने या भागातील अवैध नळ कनेक्शन न कापल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

Web Title: Half and tohounds of illegal taps connection in Khamgaon city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.