भाव नसल्याने शेतकरी हैराण! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:52 PM2017-10-05T23:52:50+5:302017-10-05T23:53:27+5:30

मेहकर : सोयाबीन पीक निघायला सुरुवात झाली असून, ४ ऑ क्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे;  मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी  हैराण झाले आहेत.

HARANAN HAS NO! | भाव नसल्याने शेतकरी हैराण! 

भाव नसल्याने शेतकरी हैराण! 

Next
ठळक मुद्देतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवकउडीद, मूग खरेदीसाठी नाफेडमार्फत नोंदणी सुरुसोयाबीनचे अनुदान अद्याप आलेच नाही!

उद्धव फंगाळ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : सोयाबीन पीक निघायला सुरुवात झाली असून, ४ ऑ क्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे;  मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी  हैराण झाले आहेत.
मेहकर तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक होते.  पावसाळ्याच्या सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस चांगला  पडला असला तरीपण त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने  याचा परिणाम सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिकांवर झाला  आहे. अनेक शेतकर्‍यांना एका एकरामध्ये केवळ ३ ते ४  िक्वंटलची झडती लागली आहे. शेतकर्‍यांना विविध बँकांकडून  पेरणीच्या वेळेवर पीक कर्ज मिळाले नसल्याने बहुतांश शे तकर्‍यांनी उसनवार करून तर उधारीवर बी-बियाणे, खते खरेदी  करुन पेरणी केली आहे; मात्र पावसाने सुद्धा वेळेवर साथ  दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पाहिजे त्या  प्रमाणात पिकांचे उत्पादन झाले नाही तर बाजारात सोयाबीनला २  हजार ५00 रुपये ते २ हजार ८00 रुपयेच भाव आहे. उडीद,  मूग, तूर, चणा, गहू या पिकांनासुद्धा भाव नाहीत. शेतात  पेरणीसाठी लागलेला खर्चसुद्धा निघतो का नाही, असा प्रश्न शे तकर्‍यांना पडला आहे, तर पेरणीसाठी लोकांकडून आणलेले  पैसे, इतर उसनवार कशी फेडावी, या विवंचनेत शेतकरी दिसत  आहेत. नुकताच दसरा सण झाला असून, दिवाळी अवघ्या  काही दिवसावर आली आहे. 
पिकांच्या उत्पादनात झालेली घट, बाजारात पिकांना भाव नसणे,  यामुळे दिवाळी साजरी कशी करायची, या चिंतेत शेतकरी आहे त. त्यामुळे शासनाने आता शेतकर्‍यांच्या पिकांना चांगला भाव  देऊन शेतकर्‍यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, हीच अपेक्षा  शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. 

उडीद, मूग खरेदीसाठी नाफेडमार्फत नोंदणी सुरु    
दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांच्या उत्पादनातही  घट होत चालली आहे. आलेल्या पिकांना मार्केटमध्ये भाव  नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत  शासनाने उडीद व मूग नाफेड मार्फत खरेदी करुन उडीद व  मुगाला हमीभाव देण्यात येणार आहे. मूग ५ हजार ५७५ रुपये तर  उडीद ५ हजार ४00 रुपये भावाने खरेदी करण्यात येणार आहे.  त्यासाठी शेतकर्‍यांनी २0१७-१८ चा सात-बारा, पीक पेरा पत्रक, त्या पत्रकावर उडीद, मुगाचा उल्लेख असावा, बँकेची  पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड व मोबाइल नंबर ही सर्व कागदपत्रे  नाफेड केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करुन घ्यावी, असे  खरेदी-विक्री संघाने कळविले आहे. 

सोयाबीनचे अनुदान अद्याप आलेच नाही!
मागील वर्षी सोयाबीनची आवक चांगल्या प्रमाणात झाली होती;  परंतु बाजारात सोयाबीनला भाव नव्हते. त्यामुळे शासनाने शे तकर्‍यांना मदत करण्याच्या उद्देशाने सोयाबीनला प्रति क्विंटल  २00 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे हजारो शे तकर्‍यांनी या अनुदानासाठी नोंदणी करुन दिलेली आहे; मात्र  गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून या अनुदानाचे मेहकर तालुक्यातील  जवळपास दीड कोटी रुपये शासनाकडे थकीत असून,  शासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी मात्र परेशान झाले आहेत. 

Web Title: HARANAN HAS NO!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.