वस्तूंसाठी विवाहितेचा छळ; सासऱ्यानेच केला विनयभंग सासरच्या दहा जणांविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Published: April 24, 2024 05:25 PM2024-04-24T17:25:08+5:302024-04-24T17:26:17+5:30
घरात गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी सतत तगादा लावून एका ३६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
अनिल गवई,खामगाव: घरात गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी सतत तगादा लावून एका ३६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्याचवेळी सासऱ्याने विवाहितेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून सासरच्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, खामगाव माहेर असलेल्या पद्माक्षी व-होकर यांचा विवाह अमरावती येथील आर्चिस रविंद्र व-होकर यांच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर विवाहितेचा घरात गृहपयोगी वस्तू खरेदीसाठी छळ सुरू केला.
वस्तूसाठी मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला. त्याचवेळी सासऱ््यांनी विनयभंग केल्याचेही तक्रारीत म्हटले. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी पती आर्चिस रविंद्र व-होकर (४०), सासरा रविंद्र ज्ञानेश्वर व-होकर (६७), सासू लता रविंद्र व-होकर ५९, मामसासरा रविकिरण मधुकर जावरकर ५७, मामेसासू चित्रा रविकिरण जावरकर ४७ सर्व रा. फिनीक्स सहजागंज नगर अर्जुन नगर अमरावती, मोठा सासरा प्रकाश ज्ञानेश्वर व-होकर ७०, मोठी सासू शालिनी ज्ञानेश्वर व-होकर, ६०, जेठ आशिष प्रकाश व-होकर ४१, जेठाणी मीनल आशीष व-होकर ३६ सर्व रा. आझाद चौक शे. घाट ता. वरूड जि. अमरावती आणि नणंद सारिका मंगेश चुके ४२ रा. पंचम सोसायटी नांदेड सिटी पुणे यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास मपोका अर्चना उमाळे करीत आहेत.