दुचाकीसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा
By अनिल गवई | Published: March 7, 2024 04:43 PM2024-03-07T16:43:51+5:302024-03-07T16:44:55+5:30
खामगाव येथील मिल्लत कॉलनीमध्ये माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यानी दुचाकीसाठी छळ केला.
अनिल गवई, खामगाव: येथील मिल्लत कॉलनीमध्ये माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यानी दुचाकीसाठी छळ केला. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिरदोस जी मोहमद गुलाम नबी (२३) हिचा विवाह मोहमद गुलामनबी मोहद अय्याज रा. सिद्दीकीया नगर याच्यासोबत झाला. लग्नानंतर ती सासरी नांदायला नांदुरा येथे गेली. सुरूवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्यांनी ६ मे २०१८ ते ५ डिसेंबर २३ चे पूर्वी सासरच्यांनी दुचाकी तसेच विविध कारणांनी विवाहितेचा छळ केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी पती मोहमद गुलामनबी मोहद अय्याज (२५), सासू सईदाबी ज अब्दुल हमीद (५०), जेठ अब्दुल अब्दुल हमीद (३०), जेठ मोहमद अहमद अब्दुल हमीद (४०) सर्व रा. सिद्दीकीया नगर, नांदुरा आणि नणंद सुलताना परवीन अब्दुल कादर (२७) रा. गैबीनगर नांदुरा, सयदाबी अब्दुल रफीक(४५)रा. माटरगाव खु , ता शेगाव, जेठाणी शहनाज परवीन शेख (३५), जेठाणी कौसर परवीन शेख जमील (३५), जेठाणी यास्मीन परवीन अब्दुल समद समद (३२) यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ मनोहर गोरे करीत आहेत.