हरिहर तीर्थावर भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:38 AM2017-07-27T01:38:24+5:302017-07-27T01:38:28+5:30

Harihar pilgrimage to devotees | हरिहर तीर्थावर भाविकांची मांदियाळी

हरिहर तीर्थावर भाविकांची मांदियाळी

googlenewsNext
ठळक मुद्देश्रावण सोमवारचे औचित्य : पवित्र जलधारेत स्नान

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना, या महिन्यात चोहीकडे हिरवळ व मध्येच येणारा पाऊस मनाला हर्षोल्हासित करून जातो. यावर्षी वेळेवर येणाºया पावसामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. यातच श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारला हरिहर तीर्थ हिवरा आश्रम येथे भाविकांनी एकच गर्दी केली होती.
भाविकांचे दैवत असलेल्या भोलेनाथ शिवशंकराची पूजा करण्याचा दिवस म्हणजे सोमवार. त्यातल्या त्यात श्रावणातला पहिला सोमवार हा त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा आहे. विवेकानंद आश्रमाचे हरिहरतीर्थ २४ जुलै रोजी भाविकांनी फुलून गेले होते. पवित्र जलधारेत स्नान करून हजारो भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले.
महादेव मंदिराला लागूनच असलेल्या परिसरात भगवान विष्णू बालाजीचे भव्य मंदिर व सभामंडप भाविकांचे लक्ष वेधून घेते. भक्तिमय वातावरणाने पवित्र झालेल्या या परिसरात मन:शांती मिळते. भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास भाविकांना आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात महिनाभर या ठिकाणी गर्दी होते, तर अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Web Title: Harihar pilgrimage to devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.