हरियाणातील बनावट डॉक्टरची खामगावात प्रॅक्टीस

By अनिल गवई | Published: June 10, 2023 03:10 PM2023-06-10T15:10:14+5:302023-06-10T15:13:16+5:30

खामगाव शहर पोलीसांची कारवाई : पाच लाखाच्या मुद्देमालासह डॉक्टर जेरबंद

Haryana fake doctor practices in Khamgaon | हरियाणातील बनावट डॉक्टरची खामगावात प्रॅक्टीस

हरियाणातील बनावट डॉक्टरची खामगावात प्रॅक्टीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विविध असाध्य आजारावर रामबाण इलाज करण्याच्या उद्देशाने खामगावात वैद्यकीय प्रॅक्टीस करणार्या एका हरियाणातील बनावट डॉक्टरला खामगाव शहर पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. या बनावट डॉक्टरकडून एका कारसह पाच लाखांची औषधी जप्त करण्यात आली.

याबाबत सविस्तर असे की, शहरातील वामन नगर परिसरात विविध असाध्य अाजाराच्या रूग्णांवर उपचार करण्याच्या उद्देशाने हरियाणातील जितेंद्रकुमार महासिंग शर्मा ३५ (रा. पाडा, ता. असंद जि. कर्नाल) हा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार करण्याचे प्रमाणपत्र नसताना विना परवाना अौषधी साठा करताना आढळून आला. यावेळी त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडून उत्तरप्रदेशातील जे.जे. आयुर्वेदिक दवाखान्याचे मुदतबाह्य प्रमाणपत्र, विविध कंपनीचा औषधसाठा, पिवळ्या आणि लाल रंगामध्ये जाहिरात पत्रके, पाढर्या रंगाची कार क्रं.डीएल -२सी – एएल- २१२२ असा एकुण चार लक्ष ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पेसोडे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात कलम, ३३,३३(अ), ३८ महाराष्ट्र वैदयकीय व्यावसायीक अधिनियम १९६१ सहकलम ४,७ ड्रग्ज अॅण्ड मॅजीव रेमीडीज अँक्ट १९५४ च्या विविध कलमान्वये शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.
चौकट...

विविध औषधांचा साठा जप्त
विविध आजारांवर गुणकारी अशा औषध साठ्यासह , कागदी लेबल, प्लास्टीक बॉटल, तुलसी, गिलोय रस,

विविध रंगाची पावडर स्वरूपातील औषधी, चूर्ण, पॅकींग बॅग, तेल, रंगबेरंगी गोळ्या असा साठा यावेळी पोलीसांनी आरोपींकडून जप्त केला.

Web Title: Haryana fake doctor practices in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर