वन्य प्राण्यांचा हैदाेस, शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:34 AM2021-03-17T04:34:42+5:302021-03-17T04:34:42+5:30
मास्क वापराकडे दुर्लक्ष किनगाव राजा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे ग्राहक व व्यापाऱ्यांकडून ...
मास्क वापराकडे दुर्लक्ष
किनगाव राजा : कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे ग्राहक व व्यापाऱ्यांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात १००० व्यक्तीमागे सात जणांना कोरोना होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मास्क वापरणे गरजेचे झाले आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे
दुसरबीड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात मधल्या काळात मिनी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र व्यावसायिक तथा ग्राहकांकडून अद्यापही शारीरिक अंतराचे पालन केले जात नाही.
नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार
सिंदखेड राजा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार मिळत आहे.
विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर ‘वॉच’
सिंदखेड राजा : संचारबंदी असताना नाहक रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांचा वॉच आहे. वाहनचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
स्वस्त धान्य दर्जेदार देण्याची मागणी
बुलडाणा : बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून माफक दराने गहू, तांदळासह अन्य स्वरूपातील धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, रेशनवर मिळणारे हे धान्य दर्जाहीन असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
स्मशानभूमी दुरुस्त करण्याची मागणी
देऊळगाव राजा : तालुक्यातील अनेक गावांतील स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. काही गावांमध्ये तर स्मशानभूमीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मशानभूमी दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
धुळीमुळे पिकाचे नुकसान
धाड : परिसरात गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड वाहने जात असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही धूळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे
वीजदेयकांची सक्तीने वसुली, ग्राहक त्रस्त
किनगाव राजा : परिसरात गत काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्यावतीने लाॅकडाऊनच्या काळातील थकीत असलेली वीजदेयके वसूल करण्याची माेहीम सुरू आहे. माेठ्या प्रमाणात आलेली देयके भरण्यासाठी सर्वसामान्यांकडे आधीच पैसे नाहीत.
निमखेड येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न
बुलडाणा : राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत जमीन आराेग्य पत्रिका सन २०२१ अंतर्गत निमखेड येथे २७ फेब्रुवारी राेजी शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शेषराव पाटील हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी सहायक बी.जी. गडबे, देशमुख आदी उपस्थित हाेते.
प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिक स्थळे बंद
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे, प्रशासनाने २३ मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढवले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिक स्थळांमध्ये सर्वसामान्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.