गारपिटीने नुकसान

By admin | Published: January 1, 2015 12:41 AM2015-01-01T00:41:41+5:302015-01-01T00:41:41+5:30

नांदुरा, संग्रामपूर तालुक्यात तुरळक गारपीट : शेतक-यांनी घेतली धास्ती.

Hazardous damage | गारपिटीने नुकसान

गारपिटीने नुकसान

Next

खामगाव (बुलडाणा): वर्षाच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी दिवसभरात अधूनमधून अवकाळी पाऊस चांगला बसरला. कोठे तुरळक, तर कोठे चांगला पाऊस झाला. संग्रामपूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली. या पावसामुळे उघड्यावर असलेला गुरांचा चारा, भाजीपाल्याचे नुकसान झाले, तर गारपिटीची धास्तीसुद्धा शेतकर्‍यांना बसली आहे. जिल्ह्यात आज पहाटे अवकाळी पावसाच्या सरी सुरु झाल्या. अधूनमधून दिवसभर पाऊस सुरू होता. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर तसेच नांदुरा तालु्क्यात व जिल्ह्यात इतरही भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस बरसला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आधीच थंडीची लाट असल्याने व आज पाऊस बरसल्याने प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. या वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखी, तापाची साथ यांसारखे आजार डोके वर काढणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरसुद्धा ताण येणार आहे. गत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात असाच झालेल्या अवकाळी पावसासोबत गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर कोरडवाहू हंगामात मात्र पावसाने खो दिल्याने शेतकर्‍यांवर व परिणामी सर्वांवरच दुष्काळाचे संकट कोसळले आहे. शासनाच्या मदत मिळणार असली तरी ती तोकडी असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक टंचाईमुळे वर्षभर विविध संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच पुन्हा अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त होत असून, पुन्हा गारपीट होईल का, अशी धास्ती शेतकर्‍यांनी घेतली आहे.

Web Title: Hazardous damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.