वडिलांचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण करून त्याने दिला दहावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 02:29 PM2020-03-07T14:29:30+5:302020-03-07T14:29:38+5:30
वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वरने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी परीक्षा केंद्र गाठले व पेपर दिला.
- सुहास वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरा : तालुक्यातील माटोडा येथील श्रीकृष्ण परशुराम खराटे यांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारखेड नजीक ५ मार्चरोजी दुपारी झालेल्या मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. त्यांचा अंत्यसंस्कार विधी ६ मार्चरोजी सकाळी दहा वाजेदरम्यान माटोडा येथील स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांचा लहान मुलगा परमेश्वर हा इयत्ता दहावीत शिकत असून त्याचा सकाळि अकरा वाजता हिंदी विषयाचा पेपर होता. वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वरने अखेर वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी परीक्षा केंद्र गाठले व पेपर दिला. या दु:खद प्रसंगी परमेश्वरने घेतलेला निर्णय व वडिलांच्या स्वप्नपूर्ती करिता पार पाडलेले कर्तव्य त्याच्या नातेवाईकांनी त्याला दिलेला आधार व परमेश्वरच्या हिंमतीचे सर्वत्र्
होत आहे
सामाजिक कार्यकर्ते मिरगे यांनी दिला धीर
तासाभरानंतर दु:खाचा डोंगर कोसळलेल्या परमेश्वर श्रीकृष्ण खराटे यास भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष शैलेश मिरगे यांनी धीर दिला. परमेश्वरला स्वत: केंद्रावर घेवून गेले. त्यानंतर परमेश्वरने हिंदीचा पेपर दिला.