अर्धवट नालेसफाईने वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:15+5:302021-06-29T04:23:15+5:30

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी बुलडाणा : येथील कला महाविद्यालयात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ...

Headaches increased by partial nallesfai | अर्धवट नालेसफाईने वाढली डोकेदुखी

अर्धवट नालेसफाईने वाढली डोकेदुखी

Next

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

बुलडाणा : येथील कला महाविद्यालयात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश बाठे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. नंदकिशोर अरूळकर होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अजय रिंढे यांनी केले. आभार अशोक सुरडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन होणे, विनोद पिंपळे, सिद्धार्थ जमधाडे यांनी परिश्रम घेतले.

लोणार तालुक्यात आरोग्य विभाग अलर्ट

लोणार : तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानंतर रविवारी अचानक ४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे किनगाव जट्टू आणि चोरपांग्रा येथील आहेत.

कपाशीकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन करा

बुलडाणा : कपाशी पिकाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन करा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) अंतर्गत जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीनवाढीच्या विविध अवस्थेत शेतीशाळा घेण्यात येत आहेत.

बसस्थानकाच्या आवारातून खासगी वाहतूक

मेहकर : बसस्थानकाच्या आवारातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असून, यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित रहावे लागत आहे. मात्र संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे. एसटी बसस्थानकापासून जवळच खासगी वाहने उभी राहतात.

Web Title: Headaches increased by partial nallesfai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.