रुग्णालय समस्यांचे माहेरघर
By admin | Published: July 20, 2014 01:25 AM2014-07-20T01:25:13+5:302014-07-20T02:03:54+5:30
लोणार ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव, रुग्णांचे हाल.
लोणार : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ग्रामीण रुग्णालय एकप्रकारे समस्यांचे माहेरघरच बनत चालले आहे. दोन वर्षापूर्वी २ कोटी ५0 लक्ष खर्च करुन ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तु लोणी रोडवर उभी करण्यात आली. परंतु गेल्या २ वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयात रुजु झालेले डॉ. बाळकृष्ण हंकारे यांच्या मनमानी कारभारामुळे याठिकाणी उपचारासाठी येणार्या रुग्णांना व विविध कामाकरीता लागणार्या प्रमाणपत्रा साठी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार गेल्या सहा महिन्यापासून केवळ २ महिला वैद्यकीय अधिकार्यांवर सुरु असुन कंत्राटी पद्धतीवर १५ डॉक्टरांचा भरणा करण्यात आलेला आहे मात्र विना परवांगी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी आहेत. रूग्णालयात वजन कमी असलेलज्या नवजात शिशुकरीता येथे वार्मर पेटीअसून ती धूळखात पडलेली असून रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामीण रुग्णालयात केवळ १४ कर्मचारीच आहेत. कर्मचार्यांचा अभाव असून सुद्धा रुग्णांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे काही तक्रारी असल्यास त्याचे निराकरण करणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ.बाळकृष्ण हंकारे यांनी सांगीतले.