यात्रा परिसरात भाविकांचे आरोग्य धोक्यात!
By admin | Published: March 16, 2017 03:08 AM2017-03-16T03:08:18+5:302017-03-16T03:08:18+5:30
सैलानी बाबाच्या यात्रेनंतर कच-याचे साचले ढिगार; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
पिंपळगाव सैलानी(जि. बुलडाणा), दि. १५- सर्व धर्माचे ङ्म्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली. देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेसाठी दाखल झाले आहेत; मात्र परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्यामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सैलानी यात्रेत बर्याच प्रमाणात भाविक झोपड्या व पाल बांधून वास्तव्य करतात. या यात्रेमध्ये बोकडे, कोंबडे, गोडभाताचे अन्न शिजवून नवस करतात; मात्र भाविक व परिसरातील खाणावळीवाले शिळे अन्न उघड्यावर, नाल्यामध्ये फेकतात. त्यामुळे परिसरात त्यांची दुर्गंंधी सुटल्याने वातावरण दूषित होते. शिवाय बर्याच वेळा मांसाहाराच्या दुकानामधील जनावरांचे वेस्टेज पदार्थसुद्धा उघड्यावर टाकत असल्यामुळे या यात्रेत जैविक प्रदूषण निर्माण होऊन परिसरात दुर्गंंधी पसरली आहे. यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे.