खामगावात आरोग्य पथक दाखल; दोन दिवस करणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:35 PM2018-10-06T17:35:04+5:302018-10-06T17:35:39+5:30
खामगाव : डेंग्यू आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगावात ३१ जणांचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. शनिवारी आणि रविवारी हे पथक शहरातील घरोघरी सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : डेंग्यू आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगावात ३१ जणांचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. शनिवारी आणि रविवारी हे पथक शहरातील घरोघरी सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहे. यावेळी रक्त नमुनेही संकलित केल्या जातील.
जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण आणि सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात शहरात हिवताप जनजागृती आणि सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या ३१ कर्मचाºयांचे पथक शहरात दाखल झाले असून वेगवेगळ्या भागात जावून डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. यामध्ये संशयास्पद रूग्णांना त्वरीत सामान्य रूग्णालयात दाखल करून रक्त चाचण्या करण्यात येतील व डेंग्युचा रूग्ण आढळल्यास त्वरीत उपचार करण्यात येतील. साचलेल्या डबक्यात औषधीची फवारणी करण्यात येणार आहे. तसेच डेंग्यु रूग्णांची लक्षणे व उपाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
शहरात धुरळणीस प्रारंभ!
डेंग्यू आणि तत्सम आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाकडून शहराच्या विविध भागात जीपीएस यंत्रणेद्वारे धुरळीस प्रारंभ केला आहे. पालिका आरोग्य विभागाच्या पथकाकडून शहरातील विविध भागात ही फवारणी केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर फवारणी करण्यात आली. शनिवारी वार्ड क्रमांक १२ मध्ये फवारणी करण्यात आली.