आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:30+5:302021-03-29T04:20:30+5:30

मेहकर : सध्या सर्वत्र कोरोना प्रतिबंध लसीकरणाची मोहीम सुरू असताना मेहकर तालुक्यामध्ये मात्र या लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात ...

Health staff review meeting | आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक

आरोग्य कर्मचाऱ्यांची आढावा बैठक

Next

मेहकर : सध्या सर्वत्र कोरोना प्रतिबंध लसीकरणाची मोहीम सुरू असताना मेहकर तालुक्यामध्ये मात्र या लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात जनतेकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तहसीलदार संजय गरकल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव साकर्शा व जानेफळ येथे ग्राम स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांची आढावा सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

६० वर्षांरील सर्व नागरिकांनी व ४५ वर्षांवरील बीपी, शुगर, हृदयरोग या व्याधीग्रस्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. सद्य:स्थितीमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसभरामध्ये दोनशेपर्यंत नागरिकांना लसीकरण करता येईल, अशी सुविधा उपलब्ध आहे. त्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना लसीकरण केले जाईल. त्यादृष्टीने ग्रामस्तरावर संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक यांनी सरपंच व पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील पात्र लाभार्थ्यांच्या लसीकरणाबाबत कारवाई करणे गरजेचे आहे. यापुढे १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यादृष्टीने सद्य:स्थितीत वरील सर्व पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करावी. लसीकरणाचे कसलेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. याबाबत वेळोवेळी जनजागृती केली आहे. लसीकरणाबाबत ग्रामस्थांनी कोणताही संभ्रम मनामध्ये न ठेवता बिनधास्तपणे लसीकरण करावे, असे आवाहन तहसीलदार संजय गरकल यांनी केले आहे. या सभेला सहायक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महिंद्र सरपाते, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Health staff review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.