आरोग्य उपसंचालकांना स्वाभिमानीचा घेराव
By admin | Published: September 3, 2014 10:58 PM2014-09-03T22:58:55+5:302014-09-03T22:59:21+5:30
आरोग्य उपसंचालकांना स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यासाठी घेराव घातला.
बुलडाणा : आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे हे बुलडाणा येथे आले असता स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांना विविध मागण्यासाठी घेराव करण्यात आला. यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले.
बुलडाणा, चिखली आणि खामगाव या प्रमुख तालुक्यासह अन्य ठिकाणच्या रुग्णालयात डॉक्टरांची मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे ग्रमीण भागातील नागरीकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी लाखो रूपये खर्च करून रूग्णालयाच्या ईमारती बांधल्या आहेत. आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.मात्र डॉक्टरच नसल्यामुळे रुग्णांना बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. बुलडाणा येथील रूग्णालयात सुध्दा डाक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नाइलाजाने रुग्णांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागतात. किंवा औरंगाबाद अथवा, अकोला येथील रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे बर्याच वेळा वेळेवर उपचारा अभावी रुग्णांना जीव गमवावा लागतो. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ व पैसा वाचवा त्यापेक्षाही रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळावा यासाठी जिल्ह्यात रिक्त असलेली डॉक्टरांची पदे त्वरीत भरावी अशी मागणी या निवेदनाद्वारे डॉ. लव्हाळे यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान लवकरच हि पदे भरण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करू असे आश्वासन आरोग्य उपसंचालकांनी दिले. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणा चंदन, दत्तु मामा टेकाळे, संतोष राजपूत, नितीन राजपूत, अमोल जाधव, राजू जाधव, फकीरा निकाळजे, दिलीप म्हस्के, पुरूषोत्तम पालकर उपस्थित होते.