सांडपाणी साचल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:52+5:302021-03-04T05:04:52+5:30

अमडापूर : येथून जवळ असलेल्या ग्रामपंचायत कव्हळा हद्दीतील वाॅर्ड क्र. ३ मध्ये रस्त्यावर सांडपाणी साचल्याने या परिसरातील ग्रामस्थांचे आराेग्य ...

The health of the villagers is in danger due to the accumulation of sewage | सांडपाणी साचल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात

सांडपाणी साचल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात

Next

अमडापूर : येथून जवळ असलेल्या ग्रामपंचायत कव्हळा हद्दीतील वाॅर्ड क्र. ३ मध्ये रस्त्यावर सांडपाणी साचल्याने या परिसरातील ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या सांडपाण्यात डासांची निर्मिती हाेऊन साथ राेगाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी गुलाबराव डोंगरदिवे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.

कव्हळा येथील वाॅर्ड क्र. ३ मध्ये रस्त्यावर गत काही दिवसांपासून घाण पाणी साचले आहे. माेठ्या प्रमाणात साचलेल्या या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती हाेऊन साथ राेग पसरण्याची भीती व्यक्त हाेत आहे. सांडपाणी साचले त्याच्या बाजूलाच गुलाबराव डोंगरदिवे हे पत्नीसह राहतात. त्यांनी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या परिसरातील ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. साचलेल्या घाण पाण्यात डासांची उत्पत्ती हाेऊन परिसरात डेंग्यूसदृश आजाराची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: The health of the villagers is in danger due to the accumulation of sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.