खामगावात उन्हाचा पारा वाढला; बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:24 PM2019-03-27T16:24:35+5:302019-03-27T16:24:41+5:30
खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 42 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 40 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत.
खरेदी करण्यासाठी नागरिक एकतर सकाळची ९ ते ११ व सांयकाळी ६ नतंर रात्री उशिरापर्यंतच्या वेळेत खरेदी करायला पसंती दर्शवित आहेत. खामगावात कापडाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही येथे खरेदी करायला येतात. गेल्या दोन दिवसांत उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. तापमानात सतत वाढ होत आहे. लग्नसराईत आदंन गिफ्ट देण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत रेलचेल असते परंतू एरवी ती मंदावली आहे. परंतू सायंकाळी मात्र गर्दी निर्दशनास येत आहे. लग्नकार्यानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेकडे धाव घेतली आहे. परंतु सोन्याचीही खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सायंकाळच्याच वेळेला पसंती दर्शविली आहे. बाजारपेठेत कुलर, फ्रीज, लग्नाचे कपडे तसेच किरणा साहित्य खरेदीवर विशेष जोर आहे. बाजारपेठेत जरी तेजी असली तरी नागरिकांच्या जीवाची उन्हामुळे लाहीलाही होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढण्याचे संकेत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा शेवट व पूर्ण मे महिना नागरिसकांना व व्यापारांना कठीण जाणार असल्याचे संकेत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना!
सायंकाळच्या वेळेत खरेदी, विक्री करावी लागणार आहे. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी, स्कार्प दुपट्टा व पाढंºया कपडयांचा वापर करण्यात येत आहे. खामगावात दिवसाला लक्षावधी रुपयांची खरेदी विक्री होते. परंतु वाढत्या उन्हाचा फटका व्यापारी वगार्लाही बसू लागला आहे.
शहरात अघोषित संचारबंदी!
गेल्या आठ दिवसांपासून उन्हात सारखी वाढ होत आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजताच रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. शहरातील प्रमुख रस्ते दुपार पूर्वीच ओस पडताहेत. दरम्यान, उकाड्यात वाढ झाल्याने, आजाराच्या संख्येतही भर पडली आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्ये रूग्णांची गर्दी दिसून येते.