वादळी वार्यासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:21 AM2017-09-12T00:21:40+5:302017-09-12T00:22:03+5:30
बुलडाणा व चिखली तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे बुलडाणा शहरासह ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली हो ती.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा व चिखली तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे बुलडाणा शहरासह ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली हो ती.
गत काही दिवसांपासून दडी दिलेल्या पाऊस सोमवारी सायंकाळी धुवाधार कोसळला. तब्बल अर्धा सुसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक वृक्ष पडले. बुलडाणा येथील बसस्थानकातील झाड हातपंपावर व ट्रॅ क्टरच्या पाण्याच्या टाकीवर पडले. त्यामुळे हातपंप तुटला तसेच टाकीचे नुकसान झाले. यावेळी येथे कुणी प्रवासी नसल्याने जीवितहानी झाली नाही. तसेच शहरातील खामगाव रोड ते जयस्तंभ चौक मार्गावर अनेक झाडे पडली. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात ठिकठिकाणी जाहिरातीसाठी लावण्यात आलेले फ्लेक्सही यावेळी पडले. काही फ्लेक्स दुकानावर व घरावर पडल्याने नुकसान झाले. जोरदार पाऊस आल्याने नाल्या तुंडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहत होते.