चिखली तालुक्यात दमदार पाऊस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:36+5:302021-09-08T04:41:36+5:30
६ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपासून ७ सप्टेंबरच्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तालुक्यात सर्वत्र कधी रिमझिम तर कधी कोसळधार याप्रमाणे पावसाने ...
६ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपासून ७ सप्टेंबरच्या सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तालुक्यात सर्वत्र कधी रिमझिम तर कधी कोसळधार याप्रमाणे पावसाने जोरदार हजेरी लावली. या एकाच पावसाने तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी गाठली आहे. साधारणत: १३ तास दमदारपणे कोसळलेल्या या पावसाने तालुक्यात ३०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता चिखली तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९८.४ टक्के पाऊस झाला आहे. विजांच्या गडगडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांची वीज रात्रभर बंद होती. यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा करावा लागला. याव्यतिरिक्त तालुक्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही, तसेच रात्रभर कोसळलेला पाऊस पिकांसाठीही पोषक असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.