अमडापूर परिसरात दमदार पाऊस, पिकांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:26+5:302021-06-30T04:22:26+5:30
अमडापूर परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच जाेरदार पाऊस झाला हाेता. त्या पावसावर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर १६ जूनला ...
अमडापूर परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच जाेरदार पाऊस झाला हाेता. त्या पावसावर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर १६ जूनला झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली़ बियाणेही वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ त्यानंतर पावसाने ११ ते १२ दिवस हुलकावणी दिली़ पेरलेल्या बियाण्यावर पाऊस पडलाच नाही. कसेबसे बियाणे उगवून आले तर ज्यांच्याकडे ओलितीची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले. मात्र कोरडवाहू मधील शेतातील बियाणे उगवून आले, त्यांना पावसाची अत्यंत आवश्यकता होती. २७ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान अमडापूरसह परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले़ थोडाफार का होईना शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला़ परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
शेती मशागतीला आला वेग
२७ जून राेजी झालेल्या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना गती आली आहे़ शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी सुरू केली आहे़ तसेच काही शेतकऱ्यांनी पहिली काेळपणी केली आहे़ पाऊस पडताच शेतकऱ्यांची पावले तणनाशक घेण्याकरिता कृषी केंद्राकडे वळली आहे. तसेच इतर मशागतीच्या कामांनाही गती मिळाली आहे़