बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस; धाडमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:25 PM2020-06-13T12:25:40+5:302020-06-13T12:25:59+5:30

पैनगंगा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे बुलडाणा-धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Heavy rains in Buldana district; Loss in Dhad | बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस; धाडमध्ये नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस; धाडमध्ये नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला असून पावसाची वार्षिक सरासरी आठ टक्क्यावर पोहोचली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हा पाऊस वादळी झाल्यामुळे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे बुलडाणा-धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटेदरम्यान पडलेल्या या दमदार पावसामुळे मलकापूर शहरातही मोठे नुकसान केले आहे. शहराचा विद्यूत पुरवठा त्यामुळे खंडीत झाला आहे. अनेक ठिकाणी वृक्ष अन्मळून पडले आहेत. धाड भागातही गुरुवारी रात्री हा वादळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यन बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात ४४ आणि मेहकर तालुक्यात ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर बुलडाणा तालुक्यात ३२, देऊळगाव राजा तालुक्यात २३, मलकापूर तालुक्यात ३८ आणि जळगाव जामोद तालुक्यात २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीनाल्यांनाही पुर आला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.
 
मलकापूरलाही फटका
विदर्भाचे प्रवेसद्वार असलेल्या मलकापूर शहरालाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. येथील विद्यूत पुरवठा गुरूवारी रात्रीपासूनच खंडीत आहे. वृक्ष उन्मळून पडले आहेत. वीजचे खांबही वाकले आहेत. सोसाट्याच्या वाºयासह हा पाऊस पडला आहे. कोरोना संसर्गाचा कहर येथेअसतानाच पावसानेही गुरूवारी येथे कहर केला.  

बुलडाणा-धाड मार्ग बंद
बुलडाणा शहरानजीक चार किमी अंतरावर असलेल्या कोलवड नजीक पैनगंगा नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने एक पर्यायी कच्चा पुल नदी पात्रात उभारण्यात आला होता. मात्र रात्री पडलेल्या पावसामुळे हा पुल वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा-धाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दुचाकी चालक मात्र नदी पात्रातील पाण्यातून त्यांची वाहने घेवून जात आहे. पुल वाहून गेल्याने या मार्गावरील जड वाहतूकही बंद आहे.


एक जण वाहून गेला
मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील एक शेतकरी पावसादरम्यान खोकर नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. दुचाकीने जांभूळधाबा येथील अनंत विरसेन पाटील हे शेतातून गावाकडे येत असताना ११ जून रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदारांनी महसूल यंत्रणेला अलर्ट केले. परिसरातील दहा ते १५ युवकांनीही अनंत पाटील यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप ते सापडले नाहीत.

 

Web Title: Heavy rains in Buldana district; Loss in Dhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.