जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:21+5:302021-09-09T04:42:21+5:30

यामध्ये सर्वाधिक पाऊस हा मोताळा तालुक्यात ६१.५ मिमी झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. मोठ्या ...

Heavy rains continued for the second day in the district | जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार

Next

यामध्ये सर्वाधिक पाऊस हा मोताळा तालुक्यात ६१.५ मिमी झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ८६ आणि लघु प्रकल्पांमध्ये ६३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी नळगंगा धरणात ५६ टक्के, पेनटाकळी प्रकल्पामध्ये २६, खडकपूर्णा प्रकल्पामध्ये ८१ टक्के जलसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांमध्येही जलसाठा वाढला आहे. यासह लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणारे १९ लघुप्रकल्पही १०० टक्के भरले आहेत.

--खडकपूर्णाचे १९ दरवाजे उघडले--

देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्वच्या सर्व १९ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून या प्रकल्पातून ३७ हजार ९४०.०७ क्युसेक (१०७३ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात खडकपूर्णा प्रकल्पाचे प्रथमच सर्वच्या सर्व दरवाजे अर्ध्या फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये या प्रकल्पाचे सर्वच्या सर्व दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी जवळपास १ लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत होता. त्या तुलनेत तूर्तास तरी पाण्याचा विसर्ग कमी आहे. त्यामुळे देऊळगावमही नजीक खडकपूर्णा नदीवर असलेला पूल पाण्याखाली जाण्याची भीती नाही.

Web Title: Heavy rains continued for the second day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.