अतिवृष्टीचा जिल्ह्यातील ८,३०० शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:22+5:302021-09-15T04:40:22+5:30
प्रामुख्याने पुराचे पाणी शेतात गेल्यामुळे, पाणी शेतातच साचल्यामुळे हे नुकसान झाले असल्याचा कृषी व आपत्ती विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. ...
प्रामुख्याने पुराचे पाणी शेतात गेल्यामुळे, पाणी शेतातच साचल्यामुळे हे नुकसान झाले असल्याचा कृषी व आपत्ती विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा मोताळा तालुक्याला बसला असून मोताळा तालुक्यात कापूस, सोयाबीन आणि मका पिकाला फटका बसला. तालुक्यातील जवळपास ३ हजार ७१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, त्या खालोखाल खामगाव तालुक्यात १ हजार ३९५ हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, उडीद आणि मका पिकाचे नुकसान झाले. बुलडाणा तालुक्यात ५ हजार ९१ हेक्टरवरील सोयाबीन, उडीद तूर, मका आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.
१६ मंडळात अतिवृष्टी
१ ते ९ सप्टेंबर दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील १६ मंडळामुळे अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने देऊळघाट मंडलात दोनदा, पाडळी मंडळात एकदा वरवड, बिबी, लाणी, खामगाव, पिंपळगाव राजा, हिवरखेड, काळेगाव, जवळपा, बोराखेडी, पिंप्री या मंडळात ही अतिवृष्टी झाली होती. या १६ मंडळामध्ये १ ते १० सप्टेंबर दरम्यान तब्बल ७ ते ६ दिवस सातत्यपूर्ण पाऊस होता.
तालुकानिहाय झालेले नुकसान
तालुका एकूण बाधित गावे बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) शेतकरी संख्या
बुलडाणा १४ ५९१ १०८३
मोताळा ९६ ३,७१३ ५०६७
खामगाव ०८ १,३९५ २१५०
एकूण ११८ ५,६९९ ८,३००