जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:58+5:302021-09-08T04:41:58+5:30

मोताळा शहरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले आहे. वीज पडून खामगावातील एका घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक ...

Heavy rains in seven districts of the district | जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यातील सात मंडलांमध्ये अतिवृष्टी

Next

मोताळा शहरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले आहे. वीज पडून खामगावातील एका घरातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज अद्याप स्पष्ट नसला तरी, नुकसानीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातही या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दुसरीकडे मोताळा आणि बुलडाणा तालुक्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून मदतीसंदर्भात केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७३ टक्क्यावर पोहोचली आहे. पावसामुळे नांदुरा-मोताळा हा मार्ग बंद झाला आहे. पूर्णा नदीसह पैनगंगा व अन्य नद्यांना पूर आलेला आहे.

Web Title: Heavy rains in seven districts of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.