हिवराआश्रम येथे आरोग्य पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:53 AM2017-08-15T00:53:05+5:302017-08-15T00:53:30+5:30
हिवराआश्रम : ‘रुग्णास डेंग्यूसदृश आजार’, या म थळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा हिवताप अधिकारी, कीटक संहारक, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक, सेविका यांची चमू हिवराआश्रम येथे दाखल झाली. यावेळी आजारग्रस्त कुटुंबाला भेट देऊन परिसरातील घरांची पाहणी करून सर्व कर्मचारी यांना पुन्हा सर्वे करून अहवाल सादर करावयाच्या सूचना जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी सोमवारी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील संगीता वसंतराव हिवाळे यांना तापाची कुणकुण लागल्याने त्यांनी येथील दवाखान्यात प्रथमोपचारासाठी गेल्या असता सदर रुग्णाला प्राथमिक अवस्थेत डेंग्यु सदृश असल्याचे निदानात लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथूनसुद्धा तपासणी केली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच १४ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण, कीटक संहारक दीपक जाधव, आरोग्य सहायक देवीदास जगताप, आरोग्यसेवक शिवशंकर बळी, राजकन्या संतोष मारके, सखाराम काकडे, राजू चांगाडे, सारिका निकम, आशा स्वयंसेविका सुमन शिंगणे, संगीता लोखंडे आदी अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. संगीता हिवाळे यांना भेट देऊन परिसरातील घरांची व परिसराची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.