दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:09+5:302021-02-23T04:52:09+5:30
बाजार समितीची सर्वसाधारण सभा बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समिती बुलडाणाची सर्वसाधारण सभा मुख्य प्रशासक जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली ...
बाजार समितीची सर्वसाधारण सभा
बुलडाणा : कृषी उत्पन्न बाजार समिती बुलडाणाची सर्वसाधारण सभा मुख्य प्रशासक जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत बाजार समितीमध्ये आगामी काळात होणाऱ्या शेतकरी हिताची विकासकामे, बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न तसेच बाजार समितीत झालेल्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.
बांधकाम साहित्याच्या दरावर नियंत्रण ठेवा
बुलडाणा : गत दोन वर्षांत तब्बल १८ हजार रुपयांनी लोखंडाचे भाव वाढले आहेत. त्यापाठोपाठ प्रत्येक बॅगमागे ७० रुपयांची वाढ झाली आहे. ही भाववाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी क्रेडाईच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
एसडीओंनी घेतली काेराेनाची लस
मेहकर : उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार संजय गरकल यांनी कोरोनाची लस घेण्याबाबतचा संदेश प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय मेहकर येथील कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली. त्याचा कुठलाही दुष्परिणाम जाणवला नाही. लस घेतल्यानंतर मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी केले आहे.
नाफेडचे खरेदी केद्र सुरू करण्याची मागणी
धामणगाव बढे : माेताळा तालुक्यातील सर्वात माेठे असलेल्या धामणगाव बढे येथे नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी माेताळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचाक रफिक सुलेमान बुचर यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कांद्यावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात
हिवरा आश्रम : परिसरात गत काही दिवसांपासून कांदा पिकावर अळ्यांनी आक्रमण केले आहे. आधीच खरीप हंगामातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून अपेक्षा हाेत्या. मात्र, गत काही दिवसांपासून कांद्यावर अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
गारपीटग्रस्तांना तातडीने मदत द्या
देउळगाव राजा : तालुक्यात १८ फेब्रुवारी राेजी वादळासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सर्वे करून तातडीने मदत देण्याची मागणी जि. प. सदस्य मनाेज कायंदे यांनी केली आहे.
एकाचदिवशी घेतले ५०० नमुने
लाेणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काेराेना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. लाेणार येथे २२ फेब्रुवारी राेजी ५०० नमुने संकलित करण्यात आले. तसेच प्रशासनाने काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.