अपघातात मृत्यू पावलेल्या खातेदाराच्या कुटुंबीयास चिखली अर्बनकडून मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:19+5:302021-01-02T04:28:19+5:30

दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने प्रत्येक बचत खातेदाराचा अपघात विमा काढला जातो. खात्यात एक हजार रुपये शिल्लक असलेले ...

Help from Chikhali Urban to the family of the account holder who died in the accident! | अपघातात मृत्यू पावलेल्या खातेदाराच्या कुटुंबीयास चिखली अर्बनकडून मदत !

अपघातात मृत्यू पावलेल्या खातेदाराच्या कुटुंबीयास चिखली अर्बनकडून मदत !

Next

दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने प्रत्येक बचत खातेदाराचा अपघात विमा काढला जातो. खात्यात एक हजार रुपये शिल्लक असलेले खातेदार अपघात विम्यासाठी पात्र ठरतात. भारज येथील पांडुरंग संपत फुले हे अशांपैकीच एक होते. पांडुरंग संपत फुले यांचे २८ जानेवारी २०२० रोजी घडलेल्या अपघातात निधन झाले. याची माहिती मिळताच बँकेने मृत्यूसंबंधीच्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून विमा कंपनीकडे पाठपुरावा करून अपघात विमा मंजूर करून घेतला आहे. दरम्यान, विमा कंपनीकडून मिळालेल्या दोन लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मृतकाचे चिरंजीव कृष्णा फुले यांना बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी चिखली शाखेचे सल्लागार समिती सदस्य प्रकाश हरगुणानी, नामदेवराव भराड, अर्चना खबुतरे, शाखाधिकारी सतीश जोशी व कर्मचारी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Help from Chikhali Urban to the family of the account holder who died in the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.