नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:33 AM2021-03-25T04:33:16+5:302021-03-25T04:33:16+5:30
मेहकरः तालुक्यात १९ व २० मार्च रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ...
मेहकरः तालुक्यात १९ व २० मार्च रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले. त्या धर्तीवर मेहकर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संजय गरकल व तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेहकर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ सर्वे करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी गजानन तात्या कृपाळ राष्ट्रवादी किसान भारती प्रदेश सरचिटणीस ,आफताब खान राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष, गिरधर पाटील ठाकरे राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष, गजानन सावंत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष, निसार अन्सारी राष्ट्रवादी शहराध्यक्ष, कैलास जाधव राष्ट्रवादी युवा नेते, कैलास सावंत राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष, नयन तायडे, किशोर जाधव, रवि दुधाट आदी उपस्थित होते.