फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:03+5:302021-07-09T04:23:03+5:30

साखरखेर्डा मंडळातील सवडद, मोहाडी भागात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. खरडून गेलेल्या ...

Help farmers whose orchards have been damaged | फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या

फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या

Next

साखरखेर्डा मंडळातील सवडद, मोहाडी भागात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. खरडून गेलेल्या जमिनीचा सर्व्हे सुरू असताना, फळबाग शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. फळबाग शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे. मोहाडी, राताळी, सवडद या भागात अनेक फळबाग शेतकरी आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने लिंबू, डाळिंब, पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी आणि महसूल विभागाने फळबागेतील झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून त्यांनाही नुकसानभरपाई द्यावी. लिंबू पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पिकाचा आणि फळबागेचा सर्वे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेषराव काळे, गणेश देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी केली आहे.

लिंबू पिकाचे नुकसान

मोहाडी येथील शेषराव काळे यांच्या फळबागेमध्ये दोन हेक्टर शेतात लिंबूची लागवड केली आहे. त्या लिंबूची मोठ्या प्रमाणात झड झाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर डाळिंब आणि पपई याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Help farmers whose orchards have been damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.