सोनालीच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे हात

By admin | Published: July 13, 2017 07:48 PM2017-07-13T19:48:01+5:302017-07-13T19:48:44+5:30

हिवराआश्रम : सर्पदंशाने पिडीत सोनाली बोरकरच्या उपचारासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून मानवतेचा परिचय दिला आहे.

Help for the treatment of Sonali | सोनालीच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे हात

सोनालीच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : सर्पदंशाने पिडीत सोनाली बोरकरच्या उपचारासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून मानवतेचा परिचय दिला आहे.
येथील भिमनगरमध्ये वास्तव्यास असलेली सोनाली एकनाथ बोरकर येथील विवेकानंद विद्या मंदिराची विद्यार्थीनी आहे. सोनाली बोरकर हिची आर्थिक परिस्थिती हलाखिची असून, तिला सर्पदंश झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कुटुंबीयांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने तिच्या मैत्रिणींनी पैसे गोळा करून तिला मदत दिली. लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच अनेक मदतीचे हात पुढे आले.  तालुका कृषी अधिकारी मेहकर यांच्यावतीने व महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने सोनालीच्या उपचारासाठी मदत निधी दिला.

समाजामध्ये अनेकजण विविध संकटांना तोंड देत आयुष्य जगतात. अशाच संकटात सापडलेल्या बोरकर कुटूंबियांना समाजातील घटकांनी मदतीचा हात देवून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले आहे.
- संतोष काकडे, तहसिलदार मेहकर.

 

Web Title: Help for the treatment of Sonali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.