पूरग्रस्तांसाठी बुलडाण्यातून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:21+5:302021-07-30T04:36:21+5:30
धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनाला बुधवारी सायंकाळी त्यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखविण्यात आली. पावसामुळे फक्त चिपळूणमध्येच सुमारे ...
धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनाला बुधवारी सायंकाळी त्यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखविण्यात आली. पावसामुळे फक्त चिपळूणमध्येच सुमारे ५०० कोटींहून जास्तीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातही मोठे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी जिल्ह्यातून खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात मेहकर येथून सुमारे ५० लाख रुपयांचे धान्य असलेली १३ वाहने गुरुवारी कोकणकडे रवाना करण्यात आली. आमदार संजय गायकवाड, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बुलडाण्यातून तीन वाहनांत सुमारे १० लाख रुपयांचे ४,१२२ किलो धान्य रवाना केले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, तालुका प्रमुख लखन गाडेकर, गजेंद्र दांदडे, धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष मृत्युंजय गायकवाड, युवासेनेचे श्रीकांत गायकवाड, मोहन पराड, ओमसिंग राजपूत, आकाश दळवी, श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव, संतोष शिंगणे, प्रवीण जाधव, ज्ञानेश्वर खांडवे, नयन शर्मा, नितीन राजपूत आदी पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बुलडाण्यातून दिलेली मदत
या वाहनांत मदतीच्या रूपात १००० किलो गहू, ३००० किलो तांदूळ, ४०० लीटर तेल, २५० किलो मिरची पावडर, १५०० किलो साखर, १२५० किलो डाळ, दोन हजार किलो मीठ, १०० किलो हळद व २५ किलोची ५० पाकिटे ज्यात सर्व साहित्याचा समावेश आहे.