पूरग्रस्तांना एक मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:40 AM2021-08-18T04:40:41+5:302021-08-18T04:40:41+5:30
अनेक गावाखेड्यांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस अन्नधान्य जमा झाले. हे जमा झालेले धान्य वर्गीकृत करून त्याच्या किट तयार करण्यात आल्या. यात ...
अनेक गावाखेड्यांतून पूरग्रस्तांसाठी भरघोस अन्नधान्य जमा झाले. हे जमा झालेले धान्य वर्गीकृत करून त्याच्या किट तयार करण्यात आल्या. यात गहू, तांदूळ, दाळ, मीठ, साखर, मिरची मसाले यासारख्या वस्तूंचे पॅकिंग करून किट तयार करण्यात आल्या. जवळपास ११२ क्विंटल अन्नधान्य पूरग्रस्तांसाठी मालवाहू वाहनाने रवाना करण्यात आले. दुर्लक्षित व दुर्गम भागातील ज्या शेतकऱ्यांचे या महापुरामुळे शेतीचे, घरादाराचे अतोनात नुकसान झाले, अशा गरजू लोकांनाच आपण मदत द्यावी, असा सर्व सहकाऱ्यांचा एकमताने विचार झाला. गरजू व पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या गावांची यादी तयार झाली. या संपूर्ण कार्यात पोलादपूर कृषी विभागाची मोलाची साथ लाभली. यात विशेष सहकार्य मंडळ अधिकारी निकम, काकड व मोरे यांचे लाभले. १४ ऑगस्टला ही सर्व धाड पंचक्रोशी टीम आपल्या घरी पोहोचली. त्यानंतर वेळ न घालवता संपूर्ण हिशेबाची गोळाबेरीज करून १५ ऑगस्टला एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. त्यात संपूर्ण हिशेबाचा लेखाजोखा देण्यात आला. वाहन चालकांचा सत्कार व धाड परिसरातील मान्यवरांची मनोगते याने संपूर्ण टीमला एक आत्मिक मनोबल प्राप्त झाले.