६५० रुग्णांना डाेळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:05+5:302021-06-17T04:24:05+5:30
धाड : बुलडाणा तालुक्यातील मासरुळ आणि धाड परिसरात मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील मासरुळ आणि धाड परिसरात मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी रुग्णसेवा संकल्प उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ६५० गरजू रुग्णांना डाेळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात देण्यात आला आहे. या रुग्णांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया जळगाव खांदेश येथे करण्यात आली. सोबतच विविध आरोग्य तपासणी शिबिर, विविध रुग्णांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत स्वरूपात करण्यात आल्या आहेत.
मनोज दांडगे यांनी परिसरातील गरजू रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देत त्यांना रुग्णालयात दाखल ते घरपोच व्यवस्था करत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. भागातील असंख्य रुग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना चष्मा वाटप करण्यात आले आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा या रुग्णसेवेचा उपक्रम थांबला होता़; मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने आणि निर्बंध शिथिल झाल्याने तालुक्यातील पाडळी येथून ५० गरजू रुग्णांना डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील गोदावरी फाऊंडेशन येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यावेळी मनोज दांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, पाडळीचे सरपंच ज्ञानेश्वर गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस कबीर बर्डे, महेंद्र कड, अच्युतराव पाटील यांची उपस्थिती होती़
१०० रुग्णांची झाली नाेंदणी
मागील १५ दिवसांपासून मासरुळ, धाड भागातील गावांमधून आवश्यक गरजू रुग्णांची नोंदणी मनोज दांडगे यांच्यावतीने करण्यात येत आहे. आजपर्यंत जवळपास १०० रुग्णांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती मनोज दांडगे यांनी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज ५० रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यात आले असून, उर्वरित लोकांना लवकरच पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.