नागझरी येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर श्रावण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:01 PM2017-08-08T20:01:00+5:302017-08-08T20:02:08+5:30

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात नागझरी आणि केशव शिवणी या दोन ठिकाणी पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून ती एका खो-यात बांधण्यात आली आहेत. दर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाकरीता अलोट गर्दी असते. 

Hemadpanthi of Nagzari, Siddheshwar Shravan | नागझरी येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर श्रावण

नागझरी येथील हेमाडपंथी सिद्धेश्वर श्रावण

Next
ठळक मुद्देदर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला दर्शनाकरीता भाविकांची अलोट गर्दीमंदिर पुरातन असून संपूर्ण दगडी खांबावर उभे; भुयार पद्धतीचे बांधकाम  मंदिराच्या पश्चिमेला गो-मुख असून, त्याून बाराही महिने पाण्याची धार अखंड वाहते

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात नागझरी आणि केशव शिवणी या दोन ठिकाणी पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर असून ती एका खो-यात बांधण्यात आली आहेत. दर श्रावण सोमवारला आणि महाशिवरात्रीला येथे दर्शनाकरीता अलोट गर्दी असते. 
नागझरी येथील सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. नागझरी हे गाव शेंदुर्जन गावापासून तीन किमी अंतरावर असून, नागझरी गाव शिवारात एका खोºयात निसर्गाच्या सानिध्यात सिद्धेश्वराचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची स्थापना कोणत्या काळात झाली आणि कोणी केली याची नोंद कोठेही नाही. हे मंदिर पुरातन असून संपूर्ण दगडी खांबावर उभे आहे. भुयार पद्धतीचे बांधकाम असून, महादेवाची पिंड आतील गाभाºयात स्थापित आहे.
सिद्धेश्वराला बेलाची लाखोळी वाहण्यासाठी आणि आपली इच्छापुर्ती करण्यासाठी भाविक भक्त महाप्रसादाचे आयोजन येथे करतात. परिसरात मोठमोठी वडाची वृक्ष असून, पिंपळ, बेल, लिंब या नानाविविध वृक्षांनी हा परिसर नटलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात कित्येक भाविक मनशांतीकरीता जप करण्यासाठी एकांत बसतात. मंदिराचे मुख पुर्वेला असून अगदी समोर पश्चिमेला गो-मुख आहे. या गो-मुखातून सतत १२ ही महिने पाण्याची धार अखंडपणे सुरु असते. भाविक या धारेखाली आंघोळ करुन मन शुद्ध करतात. या हेमाडपंथीय मंदिरात पुजारी म्हणून सुभाष वाघ काम पाहतात. या संस्थानचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून माळूबाबा यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर घागरे महाराज, दत्तु महाराज, डिघोळे महाराज यांनी सुद्धा १९ व्या शतकात येथे मंदिराची सेवा केली. मंदिराचा परिसर विकसीत व्हावा, म्हणून माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तिर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा दिला. तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत १० लाखाचे भक्त निवास येथे उभारण्यात आले. शेंदुर्जन वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने दरवर्षी भव्य भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रस्ता ही महत्वाची बाब असून, स्थानिक आमदार, जि.प.सदस्य आणि पंचक्रोशितील भाविकांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे. 

Web Title: Hemadpanthi of Nagzari, Siddheshwar Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.