तो वैद्यकीय कचरा फेकणाराच ड्रग्स अडिक्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:05+5:302020-12-25T04:28:05+5:30

डोणगाव : नशेसाठी विविध औषधांचा वापर हाेत असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. डाेणगाव येथे माेठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा ...

He's just a drug addict! | तो वैद्यकीय कचरा फेकणाराच ड्रग्स अडिक्ट !

तो वैद्यकीय कचरा फेकणाराच ड्रग्स अडिक्ट !

Next

डोणगाव : नशेसाठी विविध औषधांचा वापर हाेत असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. डाेणगाव येथे माेठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा फेकण्यात आला आहे. यामध्ये नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खाेकल्याच्या औषधांची बाॅटल असल्याचे समाेर आले आहे.

खोकल्यासाठी वापरली जाणारी कोडीन फॉस्पेट असलेली औषधी, झोपेच्या गोळ्या, ऍलर्जीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा युवक नशेसाठी वापर करीत आहेत. या औषधांमुळे कमी वेळात नशा हाेताे व तोंडाचा सुद्धा वास येत नाही. त्यामुळे युवा वर्गात अशाप्रकारे नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच डोणगावमध्ये गोहगावरोडवर फेकलेल्या वैद्यकीय कचऱ्यात इतर कचऱ्यासोबत कोडीन फॉस्पेट असलेल्या बाॅटल पडलेल्या आहेत. तो वैद्यकीय कचरा फेकणारा अज्ञात व्यक्ती ड्रग्स अडिक्ट असू शकतो किंवा नशेसाठी औषधी पुरवणारा असण्याची शक्यता आहे.

गोहगावरोडवर फेकलेल्या त्या जैविक कचऱ्यात खोकल्याची औषधं ज्यात कोडीन फॉस्पेट आहे त्या रिकाम्या बाटल्या दिसून येत आहेत. तेव्हा बाटल्या एकाच ठिकाणी जैविक कचऱ्यासोबत कोडीन फॉस्पेटच्या रिकाम्या बाटल्या फेकणारा तो कोण. एकीकडे त्या ठिकाणी सिरीनज, इंजेक्शन, इंजेक्टनसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधींच्या बाटल्या असा कित्येक जैविक कचऱ्यासोबत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन फॉस्पेटच्या बाटल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे कचरा फेकणार स्वतः नशा करतो की, नशा करणाऱ्या लोकांना औषधी पुरवतो असा संशय आहे. गत काही दिवसांपासून परिसरात बाेगस डाॅक्टारांचा सुळसुळाट आला आहे.

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात औषधी

काही औषधी केवळ डाॅक्टरांनी लिहून दिलेली असल्याच मिळतात. त्यामध्ये कोडीन फॉस्पेटचा समावेश आहे. परिसरातील अनेक औषध दुकानदार डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवायच औषधांची विक्री करीत असल्याचे या कचऱ्यावरून समाेर आले आहे.

जैविक कचरा बाहेर फेकणे चुकीचे आहे. गोहगावरोडवरील जैविक कचऱ्याची चौकशी होणे गरजेचे आहे. औषधीच्या बॅच नंबरवरून त्याचा तपास लागू शकतो. तसेच येथील काहीच डॉक्टराचे जैविक कचरा नेणाऱ्या कंपनीसोबत करार झालेले नाही. बहुतांश डॉक्टरांकडून जैविक कचरा नेला जातो.

डॉ. अनंत क्षीरसागर, अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन, डोणगाव

Web Title: He's just a drug addict!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.