'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:44 AM2017-11-20T00:44:39+5:302017-11-20T00:52:36+5:30

मलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडकला. 

Hindu Jagaran Samiti's protest against 'Padmavati' film! | 'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा!

'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा!

googlenewsNext
ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाचित्रपटावर बंदी तसेच चित्रपट निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव  हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडकला. 
संजय लीला भंसाली दिग्दर्शित महाराणी पद्मावती या चित्रपटात हिंदू धर्मातील  महान वीरांगना राणी पद्मावती यांच्या गौरवशाली इतिहासावर व हिंदू परंपरेवर  आक्षेपार्ह संवाद व दृष्ये निर्मात्यांनी चित्रीत केले आहे.  या प्रकारामुळे हिंदू समाजात  संतापाची लाट निर्माण होऊन या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. तरी हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून या चित्रपटावर बंदी घालण्यात  यावी. तसेच चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली यांच्यावर कायदेशीर कारवाई  करण्यात यावी या मागणीस्तव  बसस्थानक ते बुलडाणा रोडमार्गे उपविभागीय  अधिकारी कार्यालयावर हिंदू जागरण समितीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात  आला. यावेळी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात श्री राष्ट्रीय राज पूत करणी सेना, श्री क्षत्रीय राजपूत युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू  परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय मराठा महासंघ, दिगंबर जैन समाज संघटना  यासह भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा  संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Hindu Jagaran Samiti's protest against 'Padmavati' film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.