वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:25 AM2018-03-24T01:25:48+5:302018-03-24T01:25:48+5:30

नांदुरा(बुलडाणा) :  कर्ज वसुली कामी गेलेल्या बेरार फायनान्सच्या दोन कर्मचा-यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी नांंदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Hit the finance company employees who have gone for recovery | वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण

वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण

Next
ठळक मुद्देचौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा(बुलडाणा) :  कर्ज वसुली कामी गेलेल्या बेरार फायनान्सच्या दोन कर्मचा-यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी नांंदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेरार फायनान्सचे कर्मचारी प्रशांत खंडेराव (वय २८) रा. चांदमारी यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील सतीश बिरसिंग चव्हाण याने बेरार फायनान्समधून मोटारसायकलसाठी कर्ज घेतलेले आहे. त्याच्याकडे तीन हप्त्यांचे एकूण ७८०० रुपये थकबाकी असल्याने काल सकाळी सचिन रामप्रसाद चामलाटे या सहका-यासोबत वसुलीसाठी त्याच्याकडे गेलो. यावेळी त्याने पैसे नसल्याने सायंकाळी आणून देतो म्हणून सांगितले. आम्ही सायंकाळपर्यंत नांदुरा येथे थांबलो. यावेळी सचिन चामलाटे यांनी सतीश चव्हाण याला फोन करून पैसे आणून देण्यास सांगितले; मात्र त्याने फोनवर वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही खामगावकडे दुचाकीने येत असताना सतीश चव्हाण याचा भाऊ संतोष चव्हाण, संतोष कुवारे, महादेव वानखडे व प्रवीण सावकारे यांनी रस्त्यावर आम्हाला गाठून आमच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले व बेदम मारहाण करून जखमी केले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध कलम ३०७, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Hit the finance company employees who have gone for recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.