मोफत टीईटी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:03+5:302021-07-31T04:35:03+5:30

बुलडाणा : ग्रामीण भागातील हुशार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेचे योग्य, दर्जेदार व विनामूल्य मार्गदर्शन मिळावे या ...

Holding free TET guidance webinars | मोफत टीईटी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

मोफत टीईटी मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन

Next

बुलडाणा : ग्रामीण भागातील हुशार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेचे योग्य, दर्जेदार व विनामूल्य मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतून डी.एल. एड् इंग्लिश टिचर फोरम, महाराष्ट्रच्या वतीने दिनांक १ ऑगस्टपासून ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी सायंकाळी ४-६ यावेळेत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन होणार आहे .

या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व डायटचे प्राचार्य तसेच डी.एल. एड् कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले़ महाराष्ट्रातील डी.एल. एड् विद्यार्थ्यांनी व टीईटीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी या मोफत मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन फोरमच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. आश्विनी पालवणकर, प्रा. डॉ. रामदास वायभाये, प्रा. राजेश खंडेराव, प्रा.डॉ. राम चट्टे यांच्या संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: Holding free TET guidance webinars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.