बोगस बियाण्यांची होळी

By admin | Published: March 17, 2017 02:24 AM2017-03-17T02:24:37+5:302017-03-17T02:24:37+5:30

पक्क्या बिलासह पाकीटबंद असलेल्या बियाण्यांची खरेदी करण्याचा शेतक-यांनी केला निर्धार.

Holi bogs seeds | बोगस बियाण्यांची होळी

बोगस बियाण्यांची होळी

Next

बुलडाणा, दि. १६- कापसाच्या बोगस बियाण्यांचे प्रमाण वाढले आहे. या बोगस बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे वारंवार नुकसान होते. त्यामुळे जिल्ह्यातील सिंदखेड लपाली, पाडसूड, गाडेगावसह येथील शेतकर्‍यांनी बोगस बियाण्याची होळी करुन बोगस बियाण्यांच्या चौकशीची मागणी केली, तसेच पक्के बिल व सरकारमान्य, पाकीटबंद असलेल्या कपाशी बियाण्याची खरेदी करण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला.
विदर्भामध्ये व बुलडाणा जिल्ह्यामध्ये कापूस मुख्य पिकापैकी एक आहे. जिल्ह्यात कापूस पिकाचा मोठा पेरा होतो. त्यास बीटी कापूस म्हणून सुद्धा ओळखतात. त्यात बियाण्याचा वाटा मोठा असतो. एकदा पेरणी केली की, परत त्यामध्ये दुसर्‍या वर्षापर्यंंत काहीही बदल करता येत नाही, अशा वेळेस सरकार मान्यता प्राप्त बियाण्याची लागवड करणे फार महत्त्वाचे असते. होळी सणाचे औचित्य साधून वाईट प्रवृत्तीची होळी करण्याची प्रथा आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड लपाली, गाडेगाव व पाडसूड येथील शेतकर्‍यांनी बोगस बियाण्याच्या पाकिटाची होळी करण्यात आली. परिसरात नकली बियाण्याची काही वर्षांपासून विविध नावाखाली अशा बियाण्यांची विक्री होत होती. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व त्या शेतकर्‍यांना या नकली बियाण्याची माहिती व्हावी व होणारी फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने ही होळी करण्यात आली. पक्के बिल व सरकार मान्य, सील बंद पाकिटे असल्याशिवाय कपाशी बियाण्याची खरेदी न करण्याचा निर्धार यावेळी शेतकर्‍यांनी केला.

Web Title: Holi bogs seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.