सैलानी यात्रेत गुरुवारी पेटणार नारळांची होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:21 AM2018-03-01T01:21:13+5:302018-03-01T01:21:13+5:30

पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान  ऊर्फ सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये गुरूवार, १ मार्च रोजी शे.रफिक  मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्याहस्ते  होळीची पूजाविधी करून लाखो नारळांची होळी पेटविल्या जाणार आहे. 

Holi celebrations on the celestial festival | सैलानी यात्रेत गुरुवारी पेटणार नारळांची होळी!

सैलानी यात्रेत गुरुवारी पेटणार नारळांची होळी!

googlenewsNext
ठळक मुद्देलाखो भाविकांची उपस्थिती विविध राज्यातील भाविकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान  ऊर्फ सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये गुरूवार, १ मार्च रोजी शे.रफिक  मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्याहस्ते  होळीची पूजाविधी करून लाखो नारळांची होळी पेटविल्या जाणार आहे. 
या होळीला प्रदक्षिणा घालण्यासाठी व दर्शनासाठी लाखो भाविक दाखल  झाले असून, होळी बंदोबस्तासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. होळीसाठी  व्यापार्‍यांनी नारळांचे मोठमोठे ढिगार लावले आहे तसेच भाविकांना  राहण्यासाठी राहुट्या उभ्या केल्या आहे तसेच भाविकांच्या वाहनांसाठी  िपंपळगाव सराई सैलानी रस्त्यावर मारोती मंदिराजवळील शेतामध्ये  पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच  ट्रॅफिक सुरळीत राहण्यासाठी ठाणेदार जे.एन.सय्यद प्रत्येक रस्त्यावर  ट्रॅफिक पोलीस कार्यरत राहणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक  शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त  ठेवणार आहे.

आरोग्य सुविधेसाठी ३0 डॉक्टरांसह ६0 कर्मचारी
सैलानी बाबांच्या यात्रेला येणार्‍या भाविकांसाठी बुलडाणा आरोग्य  विभागाच्यावतीने ३0 डॉक्टरांसह ६0 कर्मचार्‍यांची टिम सैलानी  यात्रेसाठी पाठविली असून, या आरोग्य सेवेची पाहणी करण्यासाठी  बुलडाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, अतिरिक्त  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोफणे यांनी सैलानी यात्रेतील आरोग्य  कॅम्पला भेट देऊन आरोग्य सेवेविषयी अडचणी जाणून घेतल्या. सैलानी  यात्रेतील भाविकांना आरोग्य विभागाच्यावतीने २४ तास आरोग्य सेवा  देणार असून, अतिआवश्यक सेवेसाठी ऑक्सिजनसह अँम्ब्युलन्सची  व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सैलानी यात्रेत ढासाळवाडी रस् त्यावर सैलानी-पिंपळगाव रस्त्यावर फिरती अँम्ब्युलन्स सेवा रूग्णांना  पुरविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण  जवंजाळ यांनी दिली. 

सैलानी बसस्थानकाच्या २00 मीटर परिसरात नो पाकिर्ंग झोन
 भाविकांच्या सोयीसाठी सैलानी येथे तीन तात्पुरते बसस्थानक उभारण्या त आले असून, बस स्थानकाच्या २00 मीटर परिसरात नो पाकिर्ंग झोन  जाहीर करण्यात आले आहे.  सैलानी यात्रेसाठी राज्य परिवहन  महामंडळाने पिंपळगाव सराई परिसरात गट ३८३ आणि पिंपळगाव सराई  ते भडगाव मार्गावर गट नंबर १२0/१२९ तसेच ढासाळवाडी गट नंबर  ३६६ मध्ये बसस्थानकांची उभारणी राज्य परिवहन महामंडळाने केली  आहे. ही नो पाकिर्ंगची अधिसूचना १0 मार्चच्या मध्यरात्रीपयर्ंत लागू  राहणार आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस  कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन  जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.
 

Web Title: Holi celebrations on the celestial festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.