चिनी वस्तुंची होळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:36 AM2017-08-10T00:36:35+5:302017-08-10T00:37:59+5:30
खामगाव : भारताला युद्धाची धमकी देणार्या चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करीत बुधवारी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने येथील टॉवर चौकात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : भारताला युद्धाची धमकी देणार्या चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करीत बुधवारी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने येथील टॉवर चौकात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली.
एकीकडे भारतामध्ये व्यापार थाटून आर्थिक स्थिती मजबूत करणार्या चीनकडून भारताला युद्धाची धमकी दिल्या जात आहे, त्यामुळे चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी वस्तुंसह विदेशी मालाचा बहिष्कार करावा आणि स्वदेशी मालाचा स्वीकार करावा, असे आवाहन करत राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने चिनी वस्तुंसह विदेशी मालाची होळी करण्यात आली. यावेळी चीनच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बजरंग दलाचे अमोल अंधारे, बाप्पु करंदीकर, विहिंपचे शहर संयोजक राजेंद्र राजपूत, गोलु ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
गांधी चौकात चिनी मालाची होळी
शेगाव : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व स्वदेशी सुरक्षा अभियान समितीच्यावतीने शहरातील गांधी चौकात चिनी मालाची होळी करण्यात आली. यावेळी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले.
सकाळी गांधी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे योगेश भारद्वाज, नितीन अवस्थी, संतोष घावट, प्रवीण मोरखडे, प्रमोद मसने, सोमेश कांबळे, अक्षय सानप, धरम पिवाल, आकाश सानप, सागर गलवाडे, पंकज माने, यशवंत पोटदुखे, शुभम दाणे, स्वदेशी समितीचे अरूण चांड, किर्तीकुमार संघाणी, भाजपा शहराध्यक्ष डॉ.मोहन बानोले, भाजपाचे नगरसेवक गजानन जवंजाळ, पत्रकार माळी, विजय यादव, मयूर जोशी, कैलास सोळंके, ओंकार गावंडे, नीलेश अंभोरे, अरविंद तायडे, राहुल चव्हाण, ऋतिक शर्मा, प्रशांत पवार, अजय जाधव, विशाल जाधव, राहुल सोळंके, नीलेश खोंड, सोनु चव्हाण आदींची उपस्थिती होती.