कृषिमंत्र्यांच्या घरासमोर बोंडअळीची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:16 AM2017-11-29T04:16:23+5:302017-11-29T04:16:35+5:30
राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर
खामगाव (बुलडाणा) : राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतक-यांना प्रती हेक्टरी १ लाख अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरासमोर शेतक-यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषिमंत्री भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेत शेतकºयांनी तब्बत चार तास रस्त्यावरच ठिय्या दिला.
बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे; मात्र शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.
सावकार व बँकांचे कर्जवसुलीसाठी सक्तीचे तगादे सुरू झाले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना सरकाकडून मदतीचा हात मागण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकºयांनी खामगावात कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते खामगावात नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकºयांनी जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.