नागपूर कराराची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:01 AM2017-09-29T01:01:04+5:302017-09-29T01:01:12+5:30
मेहकर : वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी अडसर ठरणार्या नागपूर कराराची होळी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ स प्टेंबर रोजी करण्यात आली, तसेच यावेळी विदर्भ राज्य समि तीच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळ्या घोषणाही देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी अडसर ठरणार्या नागपूर कराराची होळी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ स प्टेंबर रोजी करण्यात आली, तसेच यावेळी विदर्भ राज्य समि तीच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळ्या घोषणाही देण्यात आल्या.
वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे, यासाठी बाधा आणणार्या नागपूर कराराची होळी उपविभागीय अधिकारी मेहकर कार्यालयाच्यासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी करण्यात आली. समितीचे जिल्हाध्यक्ष अँड.सुरेश वानखेडे यांनी नागपूर कराराच्या मसुद्याला अग्नी दिला. याप्रसंगी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, या आंदोलनामध्ये विजयराज सपकाळ, मुरलीधर गवई, सोपानराव देबाजे, बी.बी. चौधरी, पी.डी.अडेलकर, सादीक कुरेशी, दत्ता मानवतकर, वसंतराव माने, सुनीता मोरे, नीलेश वानखेडे, विश्वनाथ सदार, अशोक वानखेडे, अन्वरखान पठाण, एस.जी.देशमुख, बी.एम.खान, प्रल्हाद रहाटे, श्याम पुरोहित, शेषराव पवार, आर.जी.चनखोरे, डिगांबर इंगळे, आर.के. गव्हाणे, व्ही.आर.चांदणे, एकनाथ अंभोरे, आश्रू मानवतकर, शे.हुसेन शे.इसा, अहमदशाह यांनी सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी अँड.सुरेश वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.
नागपूर कराराची होळी करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ). ईपिएफ - ९५ धारक संघटना, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटना, अखिल महाराष्ट्र मोची सुधार संघटना, मानवसेवा फाऊंडेशन, नॅशनल फाऊंडेशन यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन जाहीर पाठिंबा दिला. नागपूर कराराची होळी करताना शहरातील नागरिक उ पस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयराज सपकाळ यांनी केले.