शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना घरपोच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:02 PM2020-09-11T12:02:14+5:302020-09-11T12:02:26+5:30
३४ दिवसांचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येणार आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांच्या घरपोच शालेय पोषण आहार पोहोचविण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात दुसºया टप्प्यात ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येणार आहे.
मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार पोहोचविण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दुसºया टप्प्यात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. त्याकरिता ३४ दिवसांचा साठा पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आला आहे. हा साठा पंचायत समितीमधून प्रत्येक शाळेत पाठविण्यात येत आहे. खामगाव तालुक्यात शालेय पोषण आहाराचे वाटप होणाºया २०६ शाळा आहेत. त्यानंतर शाळेतून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शालेय पोषण आहाराचा साठा शाळेत पोहोचविल्यानंतर मुख्याध्यापक पोषण आहार विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवायचा याचे नियोजन करणार आहे. मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वर्गनिहाय शाळेत बोलावून तसेच लहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या घरपोच पोषण आहार पोहोचविण्यात येणार आहे.
त्याकरिता मुख्याध्यापक नियोजन करणार आहेत. शालेय पोषण आहार देताना शाळेत गर्दी होणार नाही, तसेच कोरोना संबंधीच्या शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पंचायत समितीमधून मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत.
प्रती विद्यार्थी ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार सध्या शाळांमध्ये पोहोचविण्यात येत आहे. त्यानंतर शाळा विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार पोहोचविणार आहे. याचे नियोजन मुख्याध्यापक करणार आहेत. मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- गजानन गायकवाड, शिक्षणाधिकारी, पं.स., खामगाव.