होमगार्ड स्वयंसेवक देणार अन्यायाविरोधात लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:19 AM2017-09-07T01:19:33+5:302017-09-07T01:19:59+5:30

शासानाच्या १३ जुलै २0१0 च्या निर्णयानुसार १२ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर होमगार्डची सेवा समाप्त करण्यात आली होती; मात्र या शासन निर्णयास १0 जुलै २0१७ रोजी स्थगिती मिळाल्याने सेवेतून कमी झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाची अवहेलना करीत होमगार्ड उपमहासमादेशक यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप जिल्हय़ातील होमगार्डनी केला असून, पूर्वीच्या स्वयंसेवकांना डावलून नवीन नोंदणी भरती प्रक्रियेस प्राधान्य दिल्या जात आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात जिल्हय़ातील होमगार्ड स्वयंसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ११ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत.

Home Guard volunteer fight against the accused! | होमगार्ड स्वयंसेवक देणार अन्यायाविरोधात लढा!

होमगार्ड स्वयंसेवक देणार अन्यायाविरोधात लढा!

Next
ठळक मुद्देशासन निर्णयानुसार संघटनेत पूर्ववत सामावून घेण्याची मागणीउपमहासमादेशक यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासानाच्या १३ जुलै २0१0 च्या निर्णयानुसार १२ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर होमगार्डची सेवा समाप्त करण्यात आली होती; मात्र या शासन निर्णयास १0 जुलै २0१७ रोजी स्थगिती मिळाल्याने सेवेतून कमी झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाची अवहेलना करीत होमगार्ड उपमहासमादेशक यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप जिल्हय़ातील होमगार्डनी केला असून, पूर्वीच्या स्वयंसेवकांना डावलून नवीन नोंदणी भरती प्रक्रियेस प्राधान्य दिल्या जात आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात जिल्हय़ातील होमगार्ड स्वयंसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ११ सप्टेंबरपासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत.
राज्यात १२ वर्षांपासून सेवा देणार्‍या होमगार्ड सेवकांना २0१0 च्या निर्णयानुसार सेवेतून कमी करण्यात आले होते. यांतर्गत जिल्हय़ातील एकूण ६८ सेवकांवर सेवा समाप्तीची कारवाई झाली असून, यामध्ये चिखली तालुक्यातील १३ होमगार्ड सेवकांचा समावेश आहे. दरम्यान, या निर्णयास ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याने बारा वर्षांचा सेवाकाळ संपल्यानंतर घरी बसलेल्या अनेक होमगार्ड सेवकांना दिलासा मिळून ते सेवेत पूर्ववत सामील होणे आवश्यक होते; मात्र होमगार्ड राज्य उपमहासमादेशक यांच्याकडून अद्यापही  त्याबाबत कारवाई झालेली नसल्याने राज्यातील अनेक होमगार्ड सेवक पूर्ववत सेवेत सामील होण्याच्या आशेवर आहेत, तर उपमहासमादेशक यांच्याकडून सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड स्वयंसेवकांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होणे व त्याबाबत सर्व जिल्हा समादेशकांना आदेश देणे होमगार्ड सेवकांना अपेक्षित होते; मात्र उपमहासमादेशक यांनी तसे न करता नियमबाहय़रीत्या नवीन नोंदणी चालविली असल्याने सेवा समाप्तीची कारवाई झालेल्या होमगार्ड सेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप सेवा समाप्तीची कारवाई झालेल्या होमगार्ड सेवकांनी केला असून, ९ व २३ ऑक्टोबर २0१७ च्या शासन निर्णयानुसार सेवा समाप्तीची कारवाई झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना पूर्ववत संघटनेत सामावून घेण्यात यावे व पटावरील रिक्त अनुशेष पूर्ण केल्यानंतरच नवीन नोंदणी भरतीचा विचार होण्यासाठी बुलडाणा जिल्हा होमगार्ड कार्यालयाने घेतलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीस तत्काळ स्थगिती मिळावी, आदी मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी बुलडाणा व जिल्हा समादेशक कार्यालयासमोर होमगार्ड माजी जिल्हा समादेशक प्रा.जगदेवराव बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आशा गवई, भगवान खरात, सुनील घट्टे, पंढरी जाधव, अशोक बाबर, अंबादास तायडे, गजानन वरपे, कौशल्या चौधरी, विजय शेळके,  अजय पाटील, अनिता राऊत, पांडुरंग सोनुने, रामदास शेळके, आर.एस. हिवाळे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Home Guard volunteer fight against the accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.