संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:51 PM2020-04-13T15:51:31+5:302020-04-13T15:51:40+5:30

एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला.

Home visits in 102 villages in Sangrampur taluka | संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी

संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी

Next

- अझहर अली
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी देण्यात आल्या. यामध्ये एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला.
 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशाखाली आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना राबवली जात आहे. आरोग्य विभाग यंत्रणेतील आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने गावांमध्ये सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या पाच दिवसात घरोघरी जाऊन ग्रामिण भागात हा गृह सर्व्हे पुर्ण करण्यात आला आहे. यामध्ये संग्रामपूर शहराला वगळण्यात आले असून ग्रामिण भागात गृह सर्व्हे करण्यात आला.
यादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमधील १ लाख ३८ हजार ९८६ नागरिकांच्या आरोग्य बाबत माहिती धेण्यात आली. तर मुंबई, पुणे व ईतर महानगरपालिकेतून तालुक्यात २ हजार ४९२ नागरीक आलेले असून एकुण १ लाख ४१ हजार ४७८ नागरीकांची प्रशासनाने माहीती गोळा करून ठेवली आहे. संग्रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३१ हजार ९९९, सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्र ४५ हजार ८८६, पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र २८ हजार २४३, तर तर वानखेड आरोग्य केंद्रा अंतर्गत ३२ हजार ८७८ नागरिकांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेत १ हजार १५६ रक्तदाब, मधुमेह ६४७, क्षयरोग ७२, दमा २९७, हृदय रोग १०७ कर्करोग ४५, अपंग ८९४, गरोधर माता ९७६ तर सर्दी, खोकला, तापीचे ६१७ रुग्ण असल्याचे या सर्वच निष्पन्न झाले. तालुक्यात घरोघरी जाऊन ३७२ अंगणवाडी सेविका व मदतनीस, १०८ आशाताई, तर १६ आरोग्य सेवक असे एकूण ४९६ कर्मचाय्रांनी गृहभेटी देऊन सर्वे केला आहे. संग्रामपूर तालुक्यात सध्या स्थिती कोरोना विषाणू संसगार्ने बाधित एकही रुग्ण नाही. या महामारी ने तालुक्यात पाय पसरू नये यासाठी आधीच योग्य ती खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.

Web Title: Home visits in 102 villages in Sangrampur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.