यंदाच्या हंगामात अंकुरणार घरगुती सोयाबीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:33 PM2020-04-28T17:33:02+5:302020-04-28T17:33:08+5:30
- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : यंदाच्या खरीप हंगामात पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता सोयाबीन उत्पादक ...
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: यंदाच्या खरीप हंगामात पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता सोयाबीन उत्पादक शेतकरी घरगुती बियाणे वापराच्या तयारीत आहेत. खामगाव तालुक्यात कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत शेतकºयांनी त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर यावर्षी बियाणे तसेच खते खरेदी करताना शेतकºयांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाउनमधून कृषी विषयक बाबींना वगळले असले, तरी प्रत्यक्षात लॉकडाउनचा परिणाम बियाणे व खते खरेदीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात सोयाबीन उत्पादक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच घरगुती बियाणे पेरणीयोग्य असल्याने शेतकरी तसेच कृषी विभाग त्या दृष्टीने तयारीला लागला आहे. शेतकºयांच्या घरात असलेले सोयाबीन पेरणीयोग्य आहे का याबाबत तपासणी करण्यात येत आहे. बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याचे काम प्रत्यक्ष शेतकºयांकडून करण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी शेतकºयांना मदत करीत आहेत.
मुळात पॅकिंगच्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असते. घरगुती बियाणेही ६० ते ६५ टक्के उगवण क्षमतेचे आहे. त्यामुळे शेतकºयांनी उगवण क्षमता तपासून त्याचा वापर करणे फायदेशिर आहे.
गणेश गिरी,
तालुका कृषी अधिकारी, खामगाव.